Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉफी विथ करण’मध्ये शर्मिला टागोर यांनी केली सैफ अली खानची पोलखोल, नवा प्रोमो आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 15:05 IST

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान हे करण जोहरच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते.

'कॉफी विथ करण सीझन 8' हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे काही एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आतापर्यंत करणच्या शोमध्ये अनेक सेलेब्सने हजेरी लावली आहे. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान करण जोहरच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. शोमध्ये करण, शर्मिला टागोर आणि सैफने एकत्र खूप धमाल केली. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा शर्मिला आणि सैफ यांचे शोमध्ये स्वागत करतो. करणशी बोलताना शर्मिला टागोर यांनी सैफ अली खानची पोलखोल केली. शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण' या शोमध्ये खुलासा केला की सैफ अली खान कॉलेजच्या दिवसात एका एअर होस्टेसला डेट करत होता. तो कॉलेज बंक करून एअर होस्टेसला भेटायला जायचा'.