अनेक सुपरहिट गाणी गायलेला गायक शान आता ‘राजा’ या मराठी चित्रपटातील काही गाणी गाणार आहे. शानने पूर्वी ‘रेती’ या मराठी चित्रपटाला संगीत दिले होते. आता तो राजा या मराठी चित्रपटातील दोन गाणी गात आहे आणि ही गाणी त्याने नुकतीच रेकॉर्ड केली आहेत. तसेच गायक सुखविंदर सिंग या चित्रपटात गाणार असून, या चित्रपटातील तीन गाणी त्याने गायली आहेत. राजा या चित्रपटाची कथा ही शशिकांत देशपांडेंची असून, दिग्दर्शनदेखील त्यांचेच आहे. या चित्रपटात अनेक नवोदित कलाकारांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा एका पॉप सिंगरच्या आयुष्यावर आधारित असून, काही दिवसांत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
शान आणि सुखविंदर सिंग गाणार मराठी चित्रपटात
By admin | Updated: February 10, 2017 03:46 IST