‘बिग बॉस 12’च्या घरातील सर्वाधिक चर्चित जोडी म्हणजे भजनसम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारू या दोघांची जोडी. त्यांच्यातील नाते सध्या चर्चेचा विषय बनले आहे. गत तीन वर्षांपासून आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, हे सांगून अनूप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर अनेकांनी अनूप व जसलीन या दोघांची खिल्ली उडवली तर अनेकांनी नॅशनल टीव्हीवर स्वत:चे नाते कबुल करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. आता या रिलेशनशिपबद्दल ताजी बातमी म्हणजे, अनूप व जसलीन यांच्यावरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर हा चित्रपट साकारला आहे. ‘जर्नी आॅफ कर्मा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यात हॉट अॅण्ड बोल्ड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेशक्ती कपूर यांची हिरोईन आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. यात ६५ वर्षांच्या शक्ती कपूर यांच्यासोबत पूनम पांडे अतिशय बोल्ड रूपात रोमान्स करतानस दिसलेय.
अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:03 IST