Join us

सर्वात मोठ्या ‘फॅन’सोबत शाहरुखचा सेल्फी!

By admin | Updated: November 8, 2015 02:42 IST

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान सध्या देशात असहिष्णुतेच्या वादात ‘फॅ न’मुळे चर्चेत आहे. दोन टीजरनंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच केले आहे. ‘फॅन’च्या नव्या

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान सध्या देशात असहिष्णुतेच्या वादात ‘फॅ न’मुळे चर्चेत आहे. दोन टीजरनंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच केले आहे. ‘फॅन’च्या नव्या पोस्टरमध्ये शाहरुखचा ‘सर्वात मोठा फॅन’ गौरव त्याचा सेल्फी काढताना दिसत आहे. तो रूममध्ये बसलेला आणि भिंतीवर शाहरुखचा फोटो लावलेला आहे. गौरवच्या हातात एक ट्रॉफी दिसत आहे. शाहरुखचा या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. एका भूमिकेत तो सुपरस्टार आर्यन खन्ना आणि दुसऱ्यात तो फॅन गौरवच्या भूमिकेत असेल. चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी याअगोदर ‘बँड बाजा बारात’चे दिग्दर्शन केले होते. आदित्य चोप्रा चित्रपटाचे निर्माता आहे. १५ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.