शाहरुखच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटाशी मुकाबला टाळण्यासाठी आता हॉलीवूडचा दिग्गज अभिनेता ब्रॅड पीटचा ‘फ्युरी’ हा चित्रपट उशिरा रिलीज होणार आहे. ‘फ्युरी’ १७ आॅक्टोबरऐवजी ३१ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. जगभरात हा चित्रपट १७ आॅक्टोबरलाच रिलीज होणार असला, तरी भारतात मात्र तो दोन आठवड्यांनी रिलीज करण्याचे ठरवण्यात आले आहे. ‘हॅप्पी न्यू ईअर’ दिवाळीनंतर म्हणजेच २४ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. सूत्रांनुसार फ्युरीच्या वितरकांना भीती आहे की, ‘हॅप्पी न्यू ईअर’समोर त्यांचा चित्रपट टिकू शकणार नाही. दुसरे म्हणजे या काळात भारतात दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात येईल, त्यामुळे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्याही कमी असेल. याचा फटका चित्रपटाला बसू नये यासाठी वितरकांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. यापूर्वी अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’शी मुकाबला टाळण्यासाठी सिल्वेस्टर स्टेलॉनचा ‘द एक्स्पांडेबल्स ३’ हा चित्रपटही उशिरा रिलीज केला होता.
शाहरुखला घाबरला बॅ्रड पीट
By admin | Updated: September 26, 2014 04:01 IST
शाहरुखच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटाशी मुकाबला टाळण्यासाठी आता हॉलीवूडचा दिग्गज अभिनेता ब्रॅड पीटचा ‘फ्युरी’ हा चित्रपट उशिरा रिलीज होणार
शाहरुखला घाबरला बॅ्रड पीट
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}