Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख रेखाचा मुकाबला

By admin | Updated: August 22, 2014 23:00 IST

बॉ लीवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा मुकाबला आता शाहरुख खानशी होणार आहे. रेखा यांचा सुपर नानी हा चित्रपट त्याच दिवशी रिलीज होतोय,

बॉ लीवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा मुकाबला आता शाहरुख खानशी होणार आहे. रेखा यांचा सुपर नानी हा चित्रपट त्याच दिवशी रिलीज होतोय, ज्यादिवशी शाहरुख खानचा हॅप्पी न्यू ईअर रिलीज होणार आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या दुस:या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहेत. सुपर नानीचे निर्माता अशोक ठाकेरिया यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. सुपर नानी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सुपर नानी या चित्रपटात रेखा शर्मन जोशीच्या आजीच्या भूमिकेत आहेत.