Join us

शाहरुखची खप्पामर्जी अजरुनला भोवली

By admin | Updated: November 11, 2014 00:09 IST

अभिनेता अजरुन कपूर हा शाहरुख खानचा कधीच चाहता नव्हता. तो नेहमीच सलमान खानचा प्रशंसक राहिला आहे. शाहरुखचा चाहता नसणो अजरुन कपूरला चांगलेच महागात पडले

अभिनेता अजरुन कपूर हा शाहरुख खानचा कधीच चाहता नव्हता. तो नेहमीच सलमान खानचा प्रशंसक राहिला आहे. शाहरुखचा चाहता नसणो अजरुन कपूरला चांगलेच महागात पडले असून, त्याच्या हातात सध्या एकही चित्रपट नसल्याची चर्चा आहे. ‘हॅप्पी न्यू ईअर’नंतर शाहरुख आता मनीष शर्मासोबत ‘फॅन’ नव्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. अजरुनदेखील मिलन लुथरियासोबत एका चित्रपटाच्या तयारीत गुंतला होता. मिलनने चित्रपटाच्या पटकथेवरील काम जवळपास पूर्ण केले होते. तुङया चित्रपटाची पटकथा शाहरुखच्या नव्या चित्रपटाशी मिळतीजुळती आहे, असे कुणी तरी मिलनच्या नजरेस आणून दिले. मिलनने लगेच या पटकथेचा नाद सोडला आता तो नव्या पटकथेवर काम करीत आहे; परंतु अजरुन कपूर मात्र रिकामाच आहे. त्याच्याजवळ आता तारखाच तारखा शिल्लक आहेत.