Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग खानची लेक सुहानाने शेअर केला बेडरूम मिरर सेल्फी, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 15:45 IST

सुहाना खान बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नसले तरी फॅन फॉलोव्हिंगच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते. सुहाना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सुहानाने सोशल मीडियावर आपले फोटो नेहमीच पोस्ट करत असते. चाहत्यांना तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील करत असतात. नुकताच सुहाना खानने इंस्टाग्रामवर बेडरूम मिरर सेल्फी शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

शाहरूख खानची लेक सुहाना खान हिने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेडरूम मिरर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडरूमच्या आरशासमोर उभी आहे आणि फोटो क्लिक करत आहे. ग्रीन क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्समध्ये सुहाना तिची फिट बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. यासह सुहानाने तिच्या टॉपला मॅचिंग बॅग देखील परिधान केली आहे. या फोटोत सुहाना खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खानने आपल्या घराची झलक इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत असते.

शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. २०१८ मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते.

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान