Join us

बिग बॉसच्या सेटवर सलमानसोबत दिसणार शाहरुख खान

By admin | Updated: December 9, 2015 19:12 IST

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आता अभिनेता सलमान खानसोबत बिग बॉसच्या सेटवर सुत्रसंचलन करताना दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आता अभिनेता सलमान खानसोबत बिग बॉसच्या सेटवर सुत्रसंचलन करताना दिसणार आहे. 
शाहरुख खान आपल्या आगामी 'दिलवाले' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने बिग बॉस-९ च्या सत्रात बजरंगी भाईजान सलमान खानसोबत सुत्रसंचलन करताना पहायला मिळणार आहे. बिग बॉस-९ च्या सत्रातील एका आगामी भागासाठी सलमान खान आणि शाहरुख खानने एकत्र शूटिंग केले असून हा भाग ऐतिहासिक होणार असल्याचे कलर वाहिनेने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. 
दिलवाले या चित्रपटात शाहरुख खानसह अभिनेत्री काजोलने भूमिका साकारली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. तसेच, हा चित्रपट १८ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.