‘फॅ न’ साठी शाहरुख खानचे प्रमोशनल कॅम्पेन सुरू आहे. एप्रिल फूलच्या दिवशी त्याला काही चाहत्यांनी आव्हानात्मक टास्क दिले होते. तेव्हाही त्याने चाहत्यांना टास्क करून दाखवून खूश केले. आता त्याला त्याच्या फॅन्सनी भरपूर पत्रे पाठवली आहेत. त्यातील काही पत्रे तो चाहत्यांसाठी वाचतो आहे. सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते खूप आहेत. त्यांचे प्रेम म्हणजे, त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. पत्रे वाचतानाचा त्याचा व्हिडीओ यूट्यूब आणि यशराज फिल्म्सच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. ‘फॅन’ हा चित्रपट थ्रिलरपट असून, शाहरुखने यात दुहेरी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट म्हणजे एक सुपरस्टार आणि त्याच्यासारखा दिसणाऱ्या फॅनची कथा आहे. ‘फॅन’च्या ट्रेलरमध्ये त्या दोघांमधील थ्रिलर सीन्स दाखवण्यात आले आहेत. पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
शाहरुखने वाचली ‘फॅन’टॅस्टिक पत्रे
By admin | Updated: April 8, 2016 02:01 IST