इंडस्ट्रीमध्ये बहुधा प्रत्येक अभिनेत्रीला किंग खानसोबत काम करण्याची इच्छा असते. तीन खानसोबत काम करणे म्हणजे बॉलिवूडमध्ये स्थान पक्के केल्यासारखे असते. त्यामुळे शाहरुखसोबत काम करण्यासाठी उत्सुक असलेली सोनमही त्याला अपवाद नाही. ‘शाहरुखला कदाचित माझ्यासोबत काम करायचे नाही’ असे तिने एका मुलाखतीमध्ये स्टेटमेंट केले होते. त्यावरून बॉलिवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सोनमच्या अशा प्रतिक्रियेमुळे शाहरुखला सुद्धा धक्का बसला. तिने असे का म्हटले, याचा जाब विचारण्यासाठी त्याने तिला फोन केल्याचे माहिती मिळतेय. सुत्रांनुसार किंग खानने सोनमची बाजू ऐकून घेतली. तिनेसुद्ध गैरसमज दूर करत सांगितले की, तिला केवळ एवढेच म्हणायचे होते की शाहरुख त्याच्या चित्रपटातील स्टारकास्ट ठरवतो.
शाहरुखने विचारला सोनमला जबाब
By admin | Updated: November 16, 2016 03:47 IST