Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहनवाझ मराठी मालिकेत

By admin | Updated: May 14, 2016 01:10 IST

‘फँटम’ या चित्रपटात हारिझ सईदची भूमिका साकारणारे अभिनेते शहनवाझ प्रधान मराठी मालिकेत झळकणार आहेत. शहनवाझ यांनी आतापर्यंत अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘फँटम’ या चित्रपटात हारिझ सईदची भूमिका साकारणारे अभिनेते शहनवाझ प्रधान मराठी मालिकेत झळकणार आहेत. शहनवाझ यांनी आतापर्यंत अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासून गौरीचे कुटुंब प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण शीवच्या कुटुंबातील कोणीही दाखवलेले नव्हते. पण आता प्रेक्षकांना शीवचे कुटुंबही पाहायला मिळणार आहे. शीव हा अमराठी दाखवल्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी ऋषी सक्सेना या अमराठी अभिनेत्याचीच निवड करण्यात आली होती. त्याच्या आईवडिलांची भूमिका साकारण्यासाठी हिंदी मालिकांमध्ये प्रसिद्ध असलेले कलाकार निवडण्यात आले आहेत. त्याच्या वडिलांची भूमिका शहनवाझ प्रधान साकारणार आहेत तर आईच्या भूमिकेत अभिनेत्री माधुरी संजीव झळकणार आहेत. माधुरी यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.