‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या ट्रेलरविषयी सर्वत्र वाहवा सुरू आहे. या चित्रपटाची कथा रॉकस्टारवर आधारित आहे की, पंजाबमधील नशा करणाऱ्या युवकांच्या अवस्थेवर आहे याबद्दल दुमत असू शकते. चित्रपटाची टीम ट्रेलरला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे खुश आहे. ‘उडता पंजाब’ मधील थीम साँग ‘चित्ता वे’ लवकरच रिलीज होणार असून ट्रेलरमध्ये जो बॅकग्राऊंड आवाज येतो तो यातूनच घेतलेला आहे. हे गाणे अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केले असून शाहीदवर गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ‘चित्ता वे’ गाण्यामधून शाहीदचा अतिशय उत्कृ ष्ट असा रॉकस्टारचा लूक दिसतो आहे. शाहीद कपूरने आत्तापर्यंत सर्वांत बेस्ट परफॉर्मन्स या चित्रपटासाठी दिला आहे. चित्रपट १७ जूनला रिलीज होणार असून अभिषेक चौबे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
‘चित्ता वे’ गाण्यात शाहीदचा रॉकस्टारवाला लूक
By admin | Updated: May 1, 2016 02:12 IST