बॉ लीवूडमध्ये काम करायचे म्हटल्यास ओव्हरवेट होऊन कसे चालेल? झीरो फिगर ठेवायची एवढंच काय ते अभिनेत्रींच्या डोक्यात असते. परफेक्ट दिसलं पाहिजे! थोडं जरी वजन वाढलं तरी लगेचच काहींना टेन्शन येतं. त्यापैकी एक म्हणजे इलियाना डिक्रुस. ती म्हणते,‘ माझ्या शरीराच्या प्रकारानुसार काही दिवसांनी लगेचच माझे वजन वाढते. त्यामुळे मी नेहमी जीम, डाएटींग करत असते. मला बिल्कुल वजन वाढवून जमत नाही. आता तर माझ्या करिअरला सुरूवात झालीय. एवढ्यात मला आऊटडेटेड व्हायचे नाहीये. तसेच तुम्ही जसे आहात तसे स्वत:वर प्रेम करा. दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करू नका.’
बाळासाठी शाहीदची पूर्वतयारी...
By admin | Updated: June 5, 2016 02:31 IST