शाहिद आणि मीराच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. सात जुलै रोजी मीरा राजपूतसोबत शाहीदची गाठ बांधली जाणार आहे. नातेवाइकांना लग्नपत्रिका पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते गुडगाव येथील ओबेरॉय हॉटेलमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी ही लग्नपत्रिका आहे. या पत्रिकेवर खालच्या बाजूला ‘नो गिफ्ट्स प्लीज, ओन्ली ब्लेसिंग्ज’ असे नमूद केलेले आहे. शाहिदने त्याच्या लग्नाची पहिली पत्रिका त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूरला पाठवली आहे. तिने शाहिदला लग्नाला येण्याचे वचन दिले होते, अशी चर्चा आहे. लग्नानंतर शाहीदची पत्नी मीरा राजपूत डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’मध्येही दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शाहिद-मीराची लग्नपत्रिका!
By admin | Updated: July 3, 2015 00:49 IST