Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरने सुरूवात केली 'जर्सी'च्या तयारीला, नव्या लूकचा फोटो होतोय व्हायरल

By तेजल गावडे | Updated: November 9, 2020 17:44 IST

शाहिद कपूर 'जर्सी' या तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूरचा यावर्षी 'कबीर सिंग' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता तो आपल्या आगामी 'जर्सी' चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. 

'जर्सी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक लवकरच हिंदीत येणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट एक स्पोर्टस ड्रामा असणार आहे. नुकतेच या चित्रपटातील शाहिद कपूरचा क्रिकेट खेळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

शाहिद कपूरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, 'जर्सीसाठी तयारी.. दे दना दन'.  या फोटोमध्ये शाहिदचा लूक हा 'कबीर सिंग' चित्रपटातील लूकसारखाच आहे. हातात ग्लोव्ह्ज आणि बॅट घेऊन शाहिद क्रिकेट खेळण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळते आहे. शाहिदच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. या फोटोला जवळपास १२ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

दिग्दर्शक गौमत टिन्नानूरी यांच्या 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात शाहिदच्या वडिलांची भूमिका पंकज कपूर दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत प्रदर्शित झालेल्या 'जर्सी'चा हिंदी रीमेक आहे. तेलगू चित्रपटात नवीन बाबू घंटा उर्फ नानी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल अद्याप काहीही खुलासा झाला नाही. 

टॅग्स :शाहिद कपूरपंकज कपूर