Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर-आलियाच्या लेकीची खास खुर्ची पाहिलीत का? शाहीन भट्टने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:37 IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा ही कायमच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर  हे दोघे कायम त्यांच्या मुलीबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. पण अद्यापही रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. पण दोघे कायम लेक राहा हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. यातच आता राहाची खुर्ची चर्चेत आली आहे. 

रणबीर आणि आलियाने आपल्या लाडक्या लेकीसाठी खास खुर्ची बनवून घेतली आहे. गुलाबी रंगाच्या या खुर्चीवर राहा असे नावही आहे. आलियाची बहिण शाहीन भट्टने हा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाहीन भट्ट आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिने कपूर आणि भट्ट कुटुंबातील सदस्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. 

नुकतेच राहाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर जून २०२२ मध्ये अभिनेत्रीने प्रग्नेंसीची घोषणा केली. तर आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केल्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरसेलिब्रिटी