Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या आवाजाची किमया!

By admin | Updated: September 21, 2016 02:49 IST

अभिनेता सोनू सूद हा त्याचा आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’ चे प्रमोशन करत आहे.

अभिनेता सोनू सूद हा त्याचा आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’ चे प्रमोशन करत आहे. शाहरुख खानने ट्रेलरला आवाज दिला आहे. तो म्हणतो,‘चित्रपटातील प्रत्येक भूमिकेची एक वेगळी कथा आहे. जेव्हा आम्हाला चित्रपटाचा ट्रेलर करायचा होता. तेव्हा आमच्या डोक्यात शाहरुखचे नाव आले. तो आमच्यासाठी घरातल्या सारखाच आहे. पण, सध्या तो प्राग येथे त्याच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. त्यामुळे ते सर्व जमवणे फारच कठीण गेले. पण, त्याने रात्री शूटिंग झाल्यानंतर ट्रेलरला आवाज दिला. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, तो माझ्या पहिल्या निर्मितीचा भाग बनला आहे.’ सोनू सूद आणि शाहरुख हे याअगोदर ‘हॅप्पी न्यू ईअर’ मध्ये एकत्र दिसले होते.