ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.20- बॉलीवुडचा किंग शाहरूख खान पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. शाहरूखचा चाहत्यांसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शाहरूख सध्या दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी तुर्कीमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये शाहरूख त्याच्या सुरक्षारक्षकांसोबत दिसत आहे. तर त्याचे सुरक्षारक्षक कोणाला तरी धक्का देऊन बाजुला करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आवाज स्पष्ट नसल्यामुळे नक्की काय झालं हे सांगणं कठीण आहे, मात्र शाहरूखच्या चेह-यावर राग स्पष्ट दिसत आहे.
यापुर्वीही शाहरूख वादात सापडला आहे. आयपीएल 2012मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यानंतर शाहरुख आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 18 मे रोजी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं एमसीए परिसरात प्रवेश करण्यासंदर्भात ५ वर्षांची बंदी घातली होती.
पाहा व्हिडीओ-