Join us

शाहरूख खानला पुन्हा 'डॉक्टरेट'

By admin | Updated: December 25, 2016 08:20 IST

अभिनेता शाहरूख खानचा हैदराबाद येथील एक युनिवर्सिटी डॉक्टरेट पदवीने सन्मान करणार आहे. हैदराबादची मौलाना आझाद नॅशनल

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 25 - अभिनेता शाहरूख खानचा हैदराबाद येथील एक युनिव्हर्सिटी डॉक्टरेट पदवीने सन्मान करणार आहे. हैदराबादची मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी शाहरूखला डॉक्टरेट पदवी देणार आहे. यासाठी 26 डिसेंबरला शाहरूख हैदराबादमध्ये जाणार असल्याचंही वृत्त आहे.   

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शाहरूखला डॉक्टरेट पदवी देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. युनिव्हर्सिटीच्या सहाव्या दिक्षांत समारंभाच्या निमित्ताने शाहरूखला हा सन्मान देण्यात येणार आहे. 
(जेव्हा शाहरूख खान बनतो 'डीजे')
 
यापुर्वीही अनेकदा शाहरूखला डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी लंडनच्या इडनबर्ग  युनिव्हर्सिटीने त्याला डॉक्टरेट पदवी दिली होती. मात्र, यंदाचा पुरस्कार शाहरूख साठी खास असणार आहे. शाहरूखची आई हैदाराबादची असल्याने त्याला या शहराबद्दल खास आपुलकी आहे. 
(शाहरूख खानची चाहत्यासोबत बाचाबाची? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल)