बॉक्स ऑफिसवर सध्या अपयशी चित्रपटांची मालिकाच सुरू आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांनी फ्लॉपच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्यात आता शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सैफचा ‘हॅपी एडिंग’ अपयशी ठरला आहे. तर त्याआधी प्रदर्शित झालेल्या गोविंदाच्या ‘किल दिल’ला सरासरी प्रतिसाद मिळाला. मात्र बॉक्स ऑफिसवरील परिस्थितीनुसार आता तोही फ्लॉप झाल्याचे दिसत आहे. शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ने रडतखडत का होईना 2क्क् कोटी क्लबमध्ये एकदाचे स्थान मिळवले आहे.
दोन लेखकांच्या प्रेमावर बनविलेल्या ‘हॅपी एडिंग’ची प्रदर्शनाच्या दिवशीची कमाई 4 कोटींपेक्षाही कमी होती. शनिवारी त्यात फारसा बदल झालेला नव्हता. रविवारी मात्र ही कमाई 5 कोटी झाली. पहिल्या तीन दिवसांत त्याने फक्त 13 कोटींच्या आसपास कमाई केली. सोमवारीही चित्रपटाची अवस्था अत्यंत वाईट होती.
55 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. हा चित्रपट शहरातल्या तरुणाईला खूप आवडेल, असे जाणकारांचे म्हणणो होते. पण त्यांनी हा चित्रपट पहिल्याच दिवशी नाकारला. नकारात्मक प्रतिक्रियांचा चित्रपटावर चांगलाच दुष्परिणाम झाला. महत्त्वाचे म्हणजे सैफचे ‘बुलेट राजा’, ‘हमशकल्स’ आणि त्यांनतर ‘हॅपी एडिंग’ हे सलग तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण सैफला हीरो म्हणून अपयश आले आहे.
याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास ‘किल दिल’ चित्रपटाची पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत दुस:या आठवडय़ात अवस्था अत्यंत वाईट आहे. 3क् कोटींची कमाई करीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसच्या बाहेर पडला. त्याचबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘6-5=2’ही बाहेर पडला. तर ‘शौकीन्स’ने 28 कोटींची कमाई करीत अक्षय कुमारच्या सुपरफ्लॉप चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले. केतन मेहतांचा ‘रंगरसिया’ही कधीच बॉक्स ऑफिसमधून बाहेर पडला.
येत्या शुक्रवारी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘उंगली’ चित्रपटात इमरान हाश्मी, कंगना तसेच संजय दत्त पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.
डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘ङोड प्लस’ चित्रपटात मोना सिंग, आदिल खान, राजीव सिंह आणि संजय मिश्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तर ‘जिद’ या रोमँटिक चित्रपटातून प्रियंका चोप्राची मावस बहीण मन्नारा हांडा आणि जाहिरातीत चमकलेला करणवीर शर्मा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
च्हॅपी एडिंग - फ्लॉप
च्किल दिल - फ्लॉप
च्6-5=2 - सुपर फ्लॉप
च्शौकीन्स- फ्लॉप
च्रंगरसिया - फ्लॉप