Join us

सेल्फी काढताय; पण जरा जपूनच!

By admin | Updated: February 11, 2016 02:28 IST

सेल्फी काढताय; पण जरा जपूनच..! अहो, असं दुसरंतिसरं कोणी नाही, तर लाखो तरुणांच्या हृदयावर अधिराज्य करणारी सई ताम्हणकर म्हणत आहे. सध्या सेल्फीच्या भूताने

सेल्फी काढताय; पण जरा जपूनच..! अहो, असं दुसरंतिसरं कोणी नाही, तर लाखो तरुणांच्या हृदयावर अधिराज्य करणारी सई ताम्हणकर म्हणत आहे. सध्या सेल्फीच्या भूताने सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांना पछाडले आहे. सेल्फी काढताना काळजी न घेतल्यामुळे, अनेक दुर्घटना झाल्या. बऱ्याच तरुणांना सेल्फी क ाढणे महागात पडले आहे. त्यामुळे आता सेलिब्रिटीच तरुणांना आवाहन करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. क्लासमेट, दुनियादारी, तूही रे, प्यारवाली लव्हस्टोरी यांसारख्या चित्रपटांमधून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली सई एका कार्यक्रमासाठी पुण्यात आली असताना तिने तिच्या चाहत्यांबराबेर सेल्फी काढले व सेल्फी काढताना स्वत:ची काळजी बाळगण्याचेही आवाहन तिने तरुणांना केले.