Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानची लेक सुहानाच्या कातिल अदा पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:10 IST

या व्हिडीओत ती खूपच सुंदर दिसतेय.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सुहानाचा कोणता ना कोणता फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतो. सुहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो तिच्या फॅन्सच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओत ती खूपच सुंदर दिसतेय. 

सुहानाच्या फॅन क्लबने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. या व्हिडीओत सुहाना कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सुहाना खूपच आकर्षक दिसते आहे. सुहानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाला आहे. सुहानाचे फॅन्स तिचे कौतुक करीत आहेत. सुहानाच्या अदा बघून असे दिसते की, ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला सहज टक्कर देऊ शकते.

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इच्छा होती. सुहाना अमेरिकेत तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. लॉकडाऊनच्या आधी ती मुंबईत घरी आली आहे. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान