Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरीब महिला जवळ येताच करोडोंची मालकीन असणारी मलायका अरोराने असे काही केले, की सारे पाहातच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 16:40 IST

मलायका अरोरामुळे त्या महिलेच्या चेह-यावरही वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा सिनेमात झळकत नसली तरीही करोडोंची मालकिन आहे. अर्जून कपूरबरोबर अनेकदा मलायका स्पॉट होते. रविवारी देखील एका रेस्टॉरंटबाहेर ती अर्जून बरोबर दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. फोटोत तिच्या सोबत एक महिला दिसत आहे. मलायकाला पाहताच ही महिला तिच्या लहान मुलीसह तिच्याजवळ आली मलायकानेही तिच्याकडून काही खरेदी केले नाही.पण क्षणाचा विलंब न करता लगेचच तिला पैसे काढून दिल्याचे दिसतंय. 

या सगळ्या गोष्टी कॅमे-या कैद झाल्या आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच तिचे कौतुक तर सोडाच मात्र तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे मलायकाचे दिर्यादिली पाहून तिचे कौतुकही करत आहेत. तिने जवळ आलेल्या महिलेला निराश केले नाही. मलायकामुळे त्या महिलेच्या चेह-यावरही वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

मलायका सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतेय. या शोदरम्यान मलायकाने आपल्या पर्सनल आयुष्यासंदर्भात अनेक खुलासे केले. आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना मलायकाला अश्रू अनावर झाले होते. मलायका खूपच इमोशनल झाली आणि तिला तिचे दिवस आठवले. मलायका म्हणाली, मला सुद्धा मोठी होऊन डान्सर व्हायचे होते. माझ्या वडिलांनी आईला सोडले होते. त्यानंतर मला आणि अमृताला आईने एकटीनेच वाढवले हे सांगताच सारे वातावरण भावूक झाले होते.''

टॅग्स :मलायका अरोरा