Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूण धवनच्या पुतणीचे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल खल्लास, बॉलिवूड बालांनाही देते मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 08:00 IST

बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट देणारा वरूण आता एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. आता वरूणच्या घरात आणखी एक व्यक्ती सुपरस्टार बनण्याच्या तयारीत आहे. तिचे नाव काय तर अंजिनी धवन.

ठळक मुद्देअंजिनी ही श्रीदेवी-बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरची खास मैत्रीण आहे.

वरूण धवनची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट देणारा वरूण आता एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. बी-टाऊनच्या लोकप्रिय व स्टाईलिश स्टार्समध्ये त्याचे नाव आवर्जुन घेतले जाते. आता वरूणच्या घरात आणखी एक व्यक्ती सुपरस्टार बनण्याच्या तयारीत आहे. तिचे नाव काय तर अंजिनी धवन. होय, अंजिनी ही वरूण धवनची पुतणी आहे. ग्लॅमरच्या बाबतीत अंजिनी बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जराही कमी नाही. 

  वरुणचा चुलत भाऊ आणि अभिनेता-निमार्ता सिद्धार्थ धवन याची अंजिनी मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून अंजिनीच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. याचे कारण म्हणजे, सोशल मीडियावरचे तिचे ग्लॅमरस फोटो.

  अंजिनीने अद्याप बॉलिवूडमध्ये येण्याचा इरादा बोलून दाखवला नाही. पण तिचा फॅशन सेन्स आणि स्टायलिश अंदाज पाहिल्यानंतर येत्या काळात बॉलिवूड डेब्यू करणा-या अनेक स्टार किड्सच्या यादीत अंजिनीचे नाव जोडले जाईल, असे मानले जात आहे.

अंजिनी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.  १८ वर्षीय अंजिनीचे इन्स्टाग्रामवर जवळपास ९१ हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत.

अंजिनी ही श्रीदेवी-बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरची खास मैत्रीण आहे. या दोघीही अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात.

  अंजिनी वरूणचे काका अनिल धवन यांची नात आहे. (अनिल धवन सुप्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचे मोठे बंधू आहेत.) अंजिनीचे वडिल सिद्धार्थ याने अनेक चित्रपटांत काम केले आहे. बºयाच टीव्ही मालिकांमध्येही तो दिसला आहे.

टॅग्स :वरूण धवन