Join us

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या सुंदर चेहऱ्याचं 'हे' आहे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 09:57 IST

तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.

नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. 

या फोटोमध्ये तिने जराही मेकअप केला नाही. तरीही इतका तजेलदार चेहरा पाहून दोन मि. निरखुन हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, मोबाईल फिल्टर केलेला हा फोटो असल्यामुळे तिच्या चेहरा थोडा वेगळाच दिसत आहे. एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी नेहा पेंडसे आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. हा तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

नेहाने तिच्या पोल डान्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. नेहा पेंडसे 5 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकली. डिझानर ब्लाऊस, नाकात नथ, गळ्यात महाराष्ट्रीयन पद्धतीचे पारंपरिक दागिने असा नेहाचा लुक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तिच्या लग्नाला बऱ्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.  तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

टॅग्स :नेहा पेंडसे