सुपरस्टार शाहरूख खान म्हणतो, माझं राहणीमान अत्यंत साधं असून खऱ्या आयुष्यात मी एक फकीर आहे. कुठलेही अघळपघळ कपडे मी घालतो आणि माझ्याकडे असलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला मला फुसरतही नाही असं त्यानं एका मुलाखतीत म्हटलं आहे.
मुलाखतीमध्ये खुलणारा शाहरूख प्रत्येकवेळी काही ना काही वेगळा मुद्दा देऊनच जातो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. चौरस ज्ञान आणि भाषेवर प्रभुत्व असलेल्या शाहरूखने वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना, मी स्टार असल्यामुळे स्टारसारखं वागतो कारण आता ते अंगवळणी पडलेलं आहे असं सांगितलं.
मला प्रत्येक भौतिक गोष्टीबाबत आकर्षण होतं. यामागचं मुख्य कारण सांगताना शाहरूख म्हणतो, ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही तिचा आपण त्याग करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक भौतिक गोष्ट मी मिळवायचा प्रयत्न केल्याचं त्यानं म्हटलं आहे. आता मी जे काही कमावतो ते सगळं चित्रपटनिर्मितीमध्ये गुंतवतो असंही त्यानं स्पष्ट केलं आहे.
शाहरूख म्हणतो मलाही मराठी सिनेमात काम करायला आवडेल... बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा...