Join us

शाहरूखला पैशांची काळजी नाही - कृती सेनन

By admin | Updated: November 15, 2015 01:49 IST

अभिनेत्री कृती सेनन हिने ‘दिलवाले’ चित्रपटातील को-स्टार शाहरूख खानविषयी काही मते मांडली. ती म्हणते की, ‘दिलवाले हा चित्रपट शाहरूख सरांसाठी एवढा महत्त्वाचा वाटतो

अभिनेत्री कृती सेनन हिने ‘दिलवाले’ चित्रपटातील को-स्टार शाहरूख खानविषयी काही मते मांडली. ती म्हणते की, ‘दिलवाले हा चित्रपट शाहरूख सरांसाठी एवढा महत्त्वाचा वाटतो की ते निर्मात्याएवढाच पैसा चित्रपटासाठी लावत आहेत. जास्तीत जास्त पैसा लावून चित्रपट उत्तमच व्हायला हवा, असे त्यांना वाटते. जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहावयास येतो तेव्हा त्याला केवळ आनंद आणि समाधान मिळाले पाहिजे.’ ‘दिलवाले’चा ट्रेलर पाहिला असता लक्षात येते की, ‘रोहित शेट्टी आणि शाहरूख हे कुठल्याच मर्यादा चित्रपटाच्या बजेटसाठी ठेवत नाहीत. ’ पुढे ती म्हणते, ‘शाहरूख खान सर जेव्हा रिहर्सल करतात तेव्हा शिस्तीत त्यांचे पॉइंट्स क्लीअर क रतात. जेव्हा टेक करतात तेव्हा असे वाटते की, ही अ‍ॅक्टिंग आहे की रिअल आहे?’