‘पुढचे पाऊल’ या मालिकेच्या पुढील भागात कथानकाला अनेक वळणं मिळणार आहेत. आॅस्ट्रेलियातील रोहितच्या म्हणजेच अभिजित केळकरच्या कंपनीत स्ट्राईक होणार आहे आणि त्यात त्याला अनेक कोटींचे नुकसान होणार आहे. हे सगळे तो मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतानाच रूपाली आणि तिची आई त्यात आणखी घोळ घालणार आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होईल. या सगळ्यांनंतर आता रूपाली रोहितकडे घटस्फोट मागणार आहे आणि वेगळी राहणार आहे. अशावेळी एक मुलगी त्याच्या मदतीला धावून येणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढणार आहे. या मुलीचे नाव तेजश्री धरणे असून, ती आॅस्ट्रेलियाच्या मोठ्या कंपनीची सीईओ आहे. तेजश्रीने रोहितला त्याच्या या संकटात मदत केल्यामुळे त्यांची घट्ट मैत्री होणार आहे आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होणार आहे. काही भागांत यांचे लग्न झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री सायली प्रधान साकारणार आहे, असे समजतेय.
‘पुढचे पाऊल’ मध्ये सायली प्रधानची एंट्री
By admin | Updated: February 10, 2017 03:40 IST