Join us  

जबरदस्त! जॉन अब्राहमच्या ‘Satyamev Jayate 2’चा ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 4:27 PM

Satyamev Jayate 2 trailer : 3 मिनिट 17 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात होते, तेच मुळी जॉनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने.

ठळक मुद्देजॉनचा हा चित्रपट गेल्या दीड वर्षापासून रखडला होता. पण आता येत्या 25 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहमचा (John Abraham) बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ (Satyamev Jayate 2 trailer ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी या चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर तुम्ही पाहायलाच हवा. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. 3 मिनिट 17 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात होते, तेच मुळी जॉनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने. एका जबरदस्त डायलॉगसोबत त्याची जबरदस्त एन्ट्री होते. पुढच्याच सीनमध्ये कुर्ता-पायजामा अशा राजकीय पुढा-याच्या वेशात जॉन दिसतो. त्याच्या चेह-यावरचा संताप आणि त्याची अ‍ॅक्शन बघताना क्षणभर अंगावर शहारा येतो. जॉनच्या अ‍ॅग्रेसिव्ह एन्ट्रीनंतर अभिनेत्री दिव्या खोसलाची एन्ट्री होते आणि पुन्हा पोलिस अधिका-याच्या लुकमधील जॉन त्याच्याच डुप्लिकेट विलनला पकडताना दिसतो. नोरा फतेहीच्या डान्स नंबरची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

‘सत्यमेव जयते 2’ ची कथा अन्याय आणि सत्तेच्या गैरवापराभोवती विणलेली आहे. जॉन अब्राहम व्यतिरिक्त, दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई, साहिल वैधी आणि अनूप सोनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्याची कथाही मिलाप झवेरीने लिहिली आहे. टी-सीरीज आणि एमी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.जॉनचा हा चित्रपट गेल्या दीड वर्षापासून रखडला होता. पण आता येत्या 25 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाचा अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि सलमान खान व आयुष शर्माचा‘अंतिम’ या दोन चित्रपटांशी संघर्ष होणार आहे. सूर्यवंशी आणि अंतिम हे दोन्ही सिनेमे 26 नोव्हेंबरला रिलीज होत आहेत.

टॅग्स :जॉन अब्राहम