Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 11:50 IST

Satish kaushik: वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वंशिकाने सतीश कौशिक यांनी घट्ट मिठी मारली आहे.

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांचं बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी रात्री उशीरा वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या १० वर्षांच्या लेकीने अत्यंत हृदयस्पर्शी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वंशिकाने शेअर केलेल्या या फोटोमुळे चाहत्यांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या आहेत.

सतीश कौशिक यांची लेक १० वर्षांची असून ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वंशिकाने सतीश कौशिक यांनी घट्ट मिठी मारली आहे. हा फोटो पाहिल्यावर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करत वंशिकाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. सतीश कौशिक यांची वंशिका ही एकुलती एक लेक असून सरोगसीद्वारे तिचा जन्म झाला आहे.

दरम्यान, सतीश कौशिक यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कलाकारांनी एकच गर्दी केली होती. यात अनुपम खेर, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर यांसारख्या कालाकारांचा समावेश होता. 

टॅग्स :सतीश कौशिकबॉलिवूडसेलिब्रिटीअनुपम खेररणबीर कपूर