Join us

'सरबजीत'साठी रणदीप हुड्डाने २८ दिवसांत १८ किलो वजन घटवले

By admin | Updated: February 5, 2016 17:53 IST

हायवे, रंग रसिया, किक, जिस्म-२ अशा अनेक चित्रपटात दमदार कामगिरी करणारा अभिनेता रणदीप हुड्डामे सरबजीत चित्रपटासाठी अवघ्या २८ दिवसांत १८ किलो वजन कमी केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ -  हायवे, रंग रसिया, किक, जिस्म-२ अशा अनेक चित्रपटात दमदार कामगिरी करणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने अवघ्या २८ दिवसांत १८ किलो वजन कमी केले आहे. 
पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेल्या सरबजित सिंग याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यात येत असून या चित्रपटात सरबजित सिंगची भूमिका रणदीप हुड्डा साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत असून त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये सरबजितला चार बाय चारच्या खोलीत कैद करण्यात आले होते, त्यावेळी त्याठिकाणी त्याला उंदरांचा चावा सहन करावा लागत होता. यात त्यांची तब्येत खूप ढासाऴली होती. तसे आम्हाला शूट करायचे होते. मी रणदीपला भेटलो, त्यावेळी त्याला म्हणलो मला तुझ्या शरिरातील हाडांचे शूट करायचे आहे. त्यावर तो म्हणाला चल लेंगे, यावर माझ्यासहीत सगऴ्यांना धक्का बसला. त्यानंतर त्याने काही दिवस जेवण कमी केले आणि फक्त पाणी आणि कॉफीवर राहिला. आम्ही पालघरला शूट करत होते, त्यावेळी तो फक्त फळे खात असल्याचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सांगितले.  
पाकिस्तानने हेरेगिरीच्या आरोपाखाली सरबजीत अनेक वर्षे तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यानंतर त्याला तुरुंगातील बाकीच्या कैद्यांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.