Join us

सारा तेंडुलकरची मॉडलिंग क्षेत्रात एन्ट्री, पण चर्चा तिच्या मिनी ड्रेसची; जाणून घ्या त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 14:02 IST

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकरनं ( Sara Tendulkar) नुकतंच मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकरनं ( Sara Tendulkar) नुकतंच मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. सारानं तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती एका क्लोदिंग ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. यामध्ये तिच्यासह ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला चित्रपट सरदार उधम (Sardar Udham) मधील रेश्माची भूमीका साकारणारी अभिनेत्री बनिता संधू (Banita Sandhu), तानिया श्रॉफही सोबत दिसत आहे. पण, साराच्या या जाहीरातीपेक्षा तिनं परिधान केलेल्या मिनी ड्रेसची चर्चा होताना दिसत आहे. त्याला कारणही तसंच आहे 

सारा सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. अनेकदा इन्स्टा स्टोरिज, व्हिडीओ आणि फोटोही ती शेअर करताना दिसते.  यापूर्वी तिनं डेट नाईट फोटो इस्टा स्टोरीवर पोस्ट केले होते आणि ते व्हायरल झाले होते. यात ती बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिच्यासोबत दिसली होती. आता तिच्या मॉडलिंगच्या व्हिडीओची चर्चा होत आहे. यात सारानं परिधान केलेला ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण, त्याची किंमत किती आहे, तुम्हाला माहित्येय? 

साराच्या या ड्रेसची किंमत २७,२९९ इतकी आहे,      

पाहा तिचे इंस्टाग्रामवरील आणखी काही फोटो 

टॅग्स :सारा तेंडुलकरसेलिब्रिटी