Join us

सारा अली खान नाही करणार 'कुली नंबर 1'चे प्रमोशन, वडिल सैफअली खानने दिलाय 'हा' मोलाचा सल्ला

By गीतांजली | Updated: October 17, 2020 16:59 IST

सारा अली खान वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'चे प्रमोशन करणार नाही आहे.

वरुण धवन आणि सारा अली खानचा कॉमेडी ड्रामा 'कुली नंबर 1' ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा  अ‍ॅमेझॉन प्राईमवर 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार सारा अली खान वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'चे प्रमोशन करणार नाही आहे. काही दिवसांपूर्वीच साराचे ड्रग्स प्रकरणात नाव आले होते. त्यानंतर एनसीबीने तिची चौकशी देखील केली. यानंतर मीडियाशी थेट संवाद ती टाळण्याचा प्रयत्न करते आहे. याच कारणामुळे सारा 'कुली नंबर 1'च्या मार्केटिंग आणि प्रमोशनमध्ये सामील होणार नाही. 

 

25 डिसेंबरला रिलीज होणार 'कुली नंबर 1'बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सिनेमांशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, हा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रत्येकाला वाटते की साराने प्रेस कॉन्फ्रेंसला येणं टाळायला हवं, एवढेच नव्हे तर नोपोटीझम संबंधीत प्रश्न टाळण्यासाठी डेव्हिड धवन आणि वरुणदेखील निवडक माध्यमांशी संवाद साधतील. 

 साराचे ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर तिच्यावर वडील सैफ अली खान नाराज आहे अशी बरीच चर्चा रंगली होती मात्र यात फारसं काही तथ्य नाही. सैफ नेहमी आपली मुलगी साराची बाजू घेतो. रिपोर्टनुसार या संपूर्ण प्रकरणावर मौने बाळगण्याची आइडिया तिला सैफनेच दिली आहे.  

 

टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान कुली नंबर वनवरूण धवन