Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! समुद्राच्या मध्यभागी साराने मारली जहाजातून उडी, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:23 IST

सारा मालदीवमध्ये असून तिने समुद्राच्या मध्यभागी जहाजातून मारली उडी आणि मग काय घडले त्यासाठी पहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिची आई अमृता सिंग व भाऊ इब्राहिम अली खानसोबत विंटर व्हॅकेशन सेलिब्रेट करत आहे. सध्या ते तिघं मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. तिथले प्रत्येक मोमेंट सारा कॅमेऱ्यात कैद करत आहे आणि सोशल मीडियावर शेअर करत आहे. 

मालदीवमध्ये सारा कधी आपल्या भावासोबत स्विमिंग करताना दिसली तर कधी आई अमृतासोबत लंच पार्टी व डिनर करताना दिसली. यादरम्यान साराने तिचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती बिकनीमध्ये समुद्रात स्विमिंगचा आनंद घेताना दिसते आहे.

व्हिडिओमध्ये पहायला मिळतंय की, साराने व्हाईट रंगाची बिकनी परिधान केलेली दिसते आहे. ती समुद्राच्या मध्यभागी जहाजात असून पाहता पाहता तिने समुद्राच्या मध्यभागी उडी मारली आणि स्विमिंग करताना दिसते आहे. हा व्हिडिओ शेअर करत साराने लिहिले की जलपरी चालली. 

यापूर्वी साराने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिने हीच बिकनी परिधान केली होती. 

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच वरूण धवनसोबत कुली नंबर १च्या रिमेकमध्ये झळकणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन करत आहेत.

याशिवाय ती कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अलीच्या लव आजकल २मध्ये झळकणार आहे.

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंगमालदीव