Join us

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राने मुंबईत घेतले स्वत:चे घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 18:33 IST

करिअरच्या सुरूवातीला विशाल भारद्वाजसारख्या दिग्गजासोबत काम करायला मिळतेय, यामुळे सान्या आनंदी आहेच. पण यापेक्षाही एका गोष्टीचा आनंद मोठा आहे. होय, हा आनंद आहे, मुंबईत स्वत:चे हक्काचे घर खरेदी केल्याचा.

‘दंगल’ या चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा लवकरचं विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ या चित्रपटात दिसणार आहे. करिअरच्या सुरूवातीला विशाल भारद्वाजसारख्या दिग्गजासोबत काम करायला मिळतेय, यामुळे सान्या आनंदी आहेच. पण यापेक्षाही एका गोष्टीचा आनंद मोठा आहे. होय, हा आनंद आहे, मुंबईत स्वत:चे हक्काचे घर खरेदी केल्याचा.होय, सान्या दीर्घकाळापासून मुंबईत आहे. आपल्या संघर्षाच्या काळात ती बराच काळ भाड्याच्या घरात राहिली. पण आता तिने मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे. सान्याने अलीकडे आपला हा आनंद बोलून दाखवला. माझे मम्मी-पप्पा अनेकदा मुंबईत माझ्याकडे राहायला यायचे. पण भाड्याच्या घरात त्यांची गैरसोय होत असलेली पाहून मला खूप वाईट वाटायचे. आता ते माझ्या स्वत:च्या घरी आरामात राहू शकतील. दरवर्षी घर बदलण्याचा त्रासही आता थांबेल, असे ती म्हणाली.लवकरच मी एक हाऊस वॉर्मिंग पार्टी करणार आहे. या पार्टीत सान्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होतील. मी आत्तापर्यंत तीन चित्रपट केलेत़ माझ्याकडे चांगल्या आॅफर्स आहेत,याचा मला आनंद आहे,असेही तिने सांगितले. लवकरच सान्या विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ मध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. ‘पटाखा’ नंतर सान्या आयुष्यमान खुराणासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘बधाई हो’ . सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे.‘बधाई हो’नंतर आणखी एक मोठा चित्रपट सान्याच्या झोळीत पडला आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित असल्याचे कळते. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस सान्याला घेऊन एक डान्सिंग सिनेमा घेऊन येतोय. बॉस्कोने सीजरसोबत मिळून आत्तापर्यंत बॉलिवूडची सुमारे २०० गाणी कोरिओग्राफ केली आहेत. आता तो दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतोय. तूर्तास बॉस्कोच्या या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण पुढील वर्षाच्या सुरूवातीला याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. सान्याने आत्तापासूनचं या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. सध्या नव-नव्या डान्सिंग स्टेप ती शिकते आहे. 

टॅग्स :सान्या मल्होत्रा