Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतोष जुवेकर, गणेश आचार्य एकत्र

By admin | Updated: March 1, 2017 02:28 IST

अस्सं सासरं सुरेख बाई या मालिकेतून अभिनेता संतोष जुवेकर हा प्रेक्षकांचे मन जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अस्सं सासरं सुरेख बाई या मालिकेतून अभिनेता संतोष जुवेकर हा प्रेक्षकांचे मन जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, संतोष जुवेकर हा लवकरच एका चित्रपटातील गाण्यावर झक्कास डान्स करताना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्या यांनी केली आहे. त्यामुळे हा अभिनेता सध्या सातवे आँसमनपर असल्याचे दिसत आहे. त्याच्या या आनंदाविषयी संतोष जुवेकर लोकमत सीएनएक्सला सांगतो, हो, एका फिल्म मध्ये एक गाणं करतोय आणि त्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक साक्षात गुरु गणेश आचार्य सर आहेत. बॉलिवुडच्या या तगडया कोरिओग्राफरबरोबर काम करण्याची संधी मिळणे म्हणजे माज्यासाठी सोनेपे सुहागा आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सध्या या गाण्याची तालीम सुरू आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माज्यासाठी खूपच छान आणि अविस्मरणीय आहे. कोरिओग्राफरबरोबरच ते माणूस म्हणूनदेखील खूप चांगला माणूस आहे. अशा या व्यक्तीसोबत काम करण्यास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. खरचं, सर तुसी ग्रेट हो म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. पण हे गाणे नक्की कोणत्या चित्रपटासाठी करत आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. मात्र प्रेक्षकांना आपल्या या लाडक्या कलाकाराचा एक झक्कास डान्स पाहायला मिळणार हे मात्र नक्की.