Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतोष जुवेकरला बॉलिवूडची लॉटरी

By admin | Updated: November 16, 2016 03:39 IST

सध्या मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांना बॉलिवूड चित्रपटांची लॉटरी लागली असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, नुकताच अभिनेता

सध्या मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांना बॉलिवूड चित्रपटांची लॉटरी लागली असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, नुकताच अभिनेता गश्मीर महाजनी याचा डोंगरी का राजा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता त्याच्या पाठोपाठ संतोष जुवेकरदेखील प्रेक्षकांना बॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या या बॉलिवूड चित्रपटाविषयी संतोष लोकमत सीएनएक्सला सांगतो, ''हो, मी ‘आश्चर्यचकित’ या बॉलिवूड चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात माझ्यासोबत प्रियांका घोषदेखील दिसणार आहे.'' खरेच हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटात भाषा सोडली तर दुसरे असे काहीच वेगळे नाही. काम करण्याची पद्धत मराठी आणि हिंदीची सारखीच आहे. माझ्यासाठी ही एका चांगली संधी आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट मिळाल्यामुळे इथेच न थांबता या पुढेही पाऊल टाकत अधिक चांगला प्रयत्न करणार असल्याचेदेखील त्याने या वेळी सांगितले आहे. सध्या तो अस्सं सासर सुरेखबाई या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याने मोरय्या, झेंडा, शाळा, रेगे, ३१ डिसेंबर, मॅटर, सुख म्हणजे नक्की काय असते असे अनेक चित्रपट केले.