Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटोशूट, चाहत्याने दिला हा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:40 IST

इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसने जगभरात हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. अशात अनेक सेलिब्रेंटीनी स्वत:ला क्वारांटाईन करुन घेतले आहे.  नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे तर काही वर्कआऊट करताना. मात्र मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. याफोटोंमध्ये संस्कृती मजा-मस्ती करताना दिसतेय. संस्कृतीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करायला सुरुवात देखील केली आहे. संस्कृतीच्या या फोटोवर तिच्या एका चाहत्याने तिला घरातून बाहेर पडू नकोस असा सल्ला दिला आहे.

       संस्कृती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर ती निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडे