Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजयची पुन्हा नवी लव्हस्टोरी...

By admin | Updated: May 4, 2015 00:25 IST

प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या एका अनोख्या जगात नेलं, तर ‘दुनियादारी’ने मैत्रीची सफर घडवून आणली. या दोन्ही सिनेमांचे मेकर असलेले संजय जाधव आपल्या

‘प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या एका अनोख्या जगात नेलं, तर ‘दुनियादारी’ने मैत्रीची सफर घडवून आणली. या दोन्ही सिनेमांचे मेकर असलेले संजय जाधव आपल्या समोर अजून एक लव्हस्टोरी घेऊन येताहेत़ सिनेमाचं नाव आहे ‘तू ही रे...!’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच रोमँटिक गाण्याच्या रेकॉर्डिंगने पार पडला असून स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत.