Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तचा पुन्हा पॅरोलसाठी अर्ज

By admin | Updated: June 16, 2015 12:23 IST

वारंवार पॅरोल, फर्लोच्या रजेवर तुरुंगातून बाहेर येणा-या अभिनेता संजय दत्तला आता पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर यायचे आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १६ - वारंवार पॅरोल, फर्लोच्या रजेवर तुरुंगातून बाहेर येणा-या अभिनेता संजय दत्तला आता पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर यायचे आहे. संजय दत्तने कारागृह विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे १४ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला असून या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.  

१९९३ मधील मुंबई बाँबस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. १६ मे २०१३ रोजी संजय दत्तची येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत तब्बल ११८ दिवस तो पॅरोल किंवा फर्लो रजेवर तुरुंगातून बाहेर राहिला होता. या प्रकारावर चोहोबाजूंनी टिका होत आहे. मात्र आता पुन्हा एकदा संजय दत्तने १४ दिवसांच्या पॅरोल रजेसाठी अर्ज केला आहे. हा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.