Join us

"तो मला छोटे कपडे घालून द्यायचा नाही", सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:04 IST

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटलं. आता इतक्या वर्षांनी संगीता बिजलानीने सलमानबाबत मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करिअरपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होता. अनेक अभिनेत्रींसोबत भाईजानचं नाव जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक होती ती म्हणजे संगीता बिजलानी. सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. संगीता बिजलानी आणिाही  सलमान लग्नही करणार होते. पण, काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटलं. आता इतक्या वर्षांनी संगीता बिजलानीने सलमानबाबत मोठा खुलासा केला आहे. 

संगीता बिजलालीने नुकतीच इंडियन आयडॉल १५ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये स्पर्धकाने तिला "करिअरमधील एक गोष्ट बदलायची असेल तर ती कोणती?" असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना संगीताने सलमानची नक्कल करत त्याचं नाव न घेता एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणाली, "तेव्हा मी माझ्या एक्सच्या दबावाखाली असायचे. तो मला छोटे कपडे घालून द्यायचा नाही. एवढे शॉर्ट नको, लांब कपडे हवे. आता मी जसे कपडे घालते तसे मी घालू शकत नव्हते. सुरुवातीला मी घालायचे. पण, नंतर असे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मी लाजायचे पण मी आता तशी नाही. आता मी गुंड झाली आहे. मला आता भीती वाटत नाही". 

९०च्या दशकात संगीता बिजलानी आणि सलमानच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. पण, काही कारणांमुळे त्यांच्यात ब्रेकअप झालं. पण, त्यानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. १९९६ मध्ये संगीताने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. पण, २०१९ साली घटस्फोट घेत ते वेगळे झाले.  

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटी