Join us

महात्मा फुले यांच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी

By admin | Updated: December 13, 2015 00:53 IST

डोंबिवली फास्ट या चित्रपटातून सामान्य माणसाच्या परिस्थितीची ओळख करून देणारा, अभिनेता संदीप कुलकर्णी हा प्रेक्षकांना लवकरच समाजसुधारक महात्मा फुले यांच्या

डोंबिवली फास्ट या चित्रपटातून सामान्य माणसाच्या परिस्थितीची ओळख करून देणारा, अभिनेता संदीप कुलकर्णी हा प्रेक्षकांना लवकरच समाजसुधारक महात्मा फुले यांच्या भूमिकेत सत्यशोधक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याविषयी, संदीप म्हणतो, की १८ व्या शतकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज प्रबोधनासाठी रुढी, परंपरा यांना छेद देत महाराष्ट्रातील स्त्रीने शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका निभावणे ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे.ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्या त्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका करण्यासाठी त्यांचा इतिहास वाचावा लागतो, त्यांचा शोध घ्यावा लागतो, त्या पात्रांशी ओळख करून घ्यावी लागते, मग ते पात्र आपल्यामध्ये उतरावे लागते. अशा या विचारवंताची भूमिका करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. त्यांनी केलेले समाजकार्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हाच माझा उद्देश असणार आहे. या चित्रपटाची शूटिंग फ्रेबुवारीमध्ये सुरू होणार असून, महात्मा फुले यांच्या २८ नोव्हेंबर २०१६ रोजी असणाऱ्या १२६ व्या पुण्यतिथीदिवशी प्रसिद्ध होणार आहे.