‘आयना का बायना’ या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक समीत कक्कड एक नवा सिनेमा घेऊन येत आहेत. ‘एक नंबर’ असं या सिनेमाचं आगळंवेगळं टायटल असून सिनेमाचं पोस्टर नुकतंच फेसबुकवर शेअर करण्यात आलं आहे. या सिनेमाची निर्मिती नीलेश नवलखा आणि विवेक कजरिया हे करणार आहेत. समीतचा हा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमधून नायक हाती तलवार घेऊन दिसतो आहे.
समीत एक नंबर...
By admin | Updated: May 2, 2015 10:17 IST