Join us
Daily Top 2Weekly Top 5

समीर ऐतिहासिक मालिकेत

By admin | Updated: June 10, 2017 00:56 IST

एका ऐतिहासिक मालिकेत समीर धर्माधिकारीची एंट्री होणार असल्याचे कळतेय. समीर या मालिकेत शाहू महाराजांची भूमिका साकारणार आहे

एका ऐतिहासिक मालिकेत समीर धर्माधिकारीची एंट्री होणार असल्याचे कळतेय. समीर या मालिकेत शाहू महाराजांची भूमिका साकारणार आहे. ही मालिका लवकरच लीप घेणार असून लीपनंतर प्रेक्षकांना या मालिकेत समीरला पाहायला मिळणार आहे. समीर ही मालिका सुरुवातीपासून पाहत आहे. या मालिकेत बाजीराव पेशव्यांचा इतिहास खूप चांगल्याप्रकारे दाखवला जात आहे. तसेच या मालिकेचे चित्रण हे खूपच चांगल्या प्रकारे केले जात आहे, असे त्याचे म्हणणे असल्याने त्याने या मालिकेसाठी होकार दिला असल्याचे कळतेय. या भूमिकेसाठी समीरच मालिकेच्या टीमची पहिली पसंती होता. त्याने सध्या या भूमिकेवर काम करायला सुरुवात केली आहे. ऐतिहासिक मालिकांमधील संवाद म्हणताना शब्दांचा उच्चार हा खूप वेगळा करावा लागतो. त्यामुळे सध्या तो यावर मेहनत घेत आहे.