या वर्षाच्या सुरुवातीलाच सलमान खानचा ‘जय हो’ चित्रपट प्रदर्शित झाला. अनेक कारणांमुळे विशेषत: सलमानने या चित्रपटाच्या प्रसिद्घीदरम्यान नरेंद्र मोदींबरोबर केलेल्या पतंगबाजीमुळे हा चित्रपट चर्चेत होता. पण अशा प्रसिद्घीचा जबरदस्त फटका सलमानला बसून ‘जय हो’ चित्रपट सपशेल अपयशी ठरला. 1क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवूनही त्याची गणना अपयशी चित्रपटांमध्ये झाली होती. त्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘किक’ चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या.
सलमानचा चित्रपट म्हटला की प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी एक विशिष्ट प्रतिमा असते. त्यांना सलमानकडून एखादा डायलॉग, एखादे गाणो, अॅक्शन सीन्स हवे असतात. कथेशी फारसे देणोघेणो नसतेच. थोडक्यात, पूर्ण सलमानमय चित्रपट हवा असतो. प्रेक्षकांची हीच नस अचूक हेरण्यात यशस्वी झालेल्या सलमानच्या ‘किक’ चित्रपटाने बाजी मारली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने 26 कोटींपेक्षा जास्त कमाई केली, तर शनिवारी 27 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. रविवारच्या सुटीचा पुरेपूर फायदा घेत 3क् कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे एकूण तीन दिवसांत 83 कोटींची कमाई करीत चित्रपटाने मोठी ‘किक’ मारली. सुपरहिट चित्रपटांच्या यादीत चित्रपटाने स्थान मिळवले आहे. आता मंगळवारी असलेल्या ईदच्या सुटीचा फायदाही चित्रपटाला होण्याची चिन्हे आहेत. जाणकारांच्या मते, सोमवारी चित्रपटाची कमाई थोडी कमी होऊ शकते; मात्र मंगळवारच्या सुटीचा फायदा घेत चित्रपट 14क् कोटींच्या आसपास कमाई करू शकतो.
‘किक’च्या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास ‘हेट स्टोरी 2’ चित्रपटाने दुस:या आठवडय़ार्पयत 26 कोटींची कमाई केली आहे. 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आपला खर्च पुरेपूर वसूल केला आहे. तर या चित्रपटाबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘पिङझा’ची कमाई 4 कोटी तर ‘अमित साहनी की लिस्ट’ने जेमतेम 3 कोटींची कमाई केली आहे. सलमानच्या ‘किक’मुळे मात्र ‘हेट स्टोरी 2’ चित्रपटाला आता ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत, नाहीतर हा चित्रपट आणखी चालला असता. करण जोहरच्या कंपनीत बनलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ची
घोडदौड सुरूच असून, त्याने आतार्पयत 77 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
या शुक्रवारी एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा ‘किक’ चित्रपटाला घेता येणार आहे. एकंदर पुढचे 12 दिवस ‘किक’चीच जादू पाहायला मिळणार असून, त्यामुळे चित्रपट 2क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवू शकतो, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.
च्किक - सुपरहिट
च्हेट स्टोरी 2 - हिट
च्अमर साहनी की लिस्ट - फ्लॉप
च्पिङझा - फ्लॉप
च्हम्प्टी शर्मा की दुल्हनिया - हिट