Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान झळकणार ‘छत्रपती शिवाजी’मध्ये

By admin | Updated: July 20, 2016 02:35 IST

बॉलिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान व अभिनेता रितेश देशमुख या दोघांचा पुन्हा ‘लई भारी’ पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान व अभिनेता रितेश देशमुख या दोघांचा पुन्हा ‘लई भारी’ पाहायला मिळणार आहे. हो, सलमान पुन्हा एकदा रितेशसोबत मराठी चित्रपटात झळकणार आहे. सलमान खानने एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी चित्रपट भूमिकेबद्दल बोलता बोलता म्हणाला, ‘‘या चित्रपटातील माझं शूटिंग पाच-सहा दिवसांत आटोपेल आणि त्याचा निर्माता रितेश आहे, हे एक बरे आहे, असं सलमान म्हणाला. मी हा चित्रपट करण्यासाठी स्वत:च्या मनाची समजूत घातली. मला माहीत आहे, मी काय करीत आहे.’’ तुम्ही पाहालच असंदेखील सलमान म्हणतो. सलमानची आई सलमा खान मराठी शिकायला मदत करणार का, असा प्रश्न त्याला विचारताच सलमानने नकारार्थी मान डोलावली. संवादलेखक आणि रितेशच माझी मदत करतील. माझी आईची मराठी हिंदी आणि इंग्रजीमिश्रित आहे, असं म्हणत त्याने हास्याची लकेर उमटवली. रितेशची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख तिच्या मुंबई फिल्म कंपनी बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करीत आहे.