Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी

By admin | Updated: December 12, 2014 23:29 IST

यावर्षीच्या फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत शंभर सेलिब्रिटींमध्ये सलमान खानला पहिले स्थान मिळाले आहे. यापूर्वी दोन वर्षे शाहरुख खान पहिल्या स्थानावर होता.

यावर्षीच्या फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत शंभर सेलिब्रिटींमध्ये सलमान खानला पहिले स्थान मिळाले आहे. यापूर्वी दोन वर्षे शाहरुख खान पहिल्या स्थानावर होता. सलमानने या यादीत क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकले आहे. यावेळी किंग खान तिस:या क्रमांकावर आहे, तर महानायक अमिताभ बच्चन यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर 2क्13 ते सप्टेंबर 2क्14 मध्ये केलेल्या सव्र्हेनुसार सलमान खान लोकप्रियतेच्या बाबतीतही पहिल्या स्थानावर आहे, तर या यादीत अमिताभ बच्चन दुस:या आणि शाहरुख तिस:या क्रमांकावर आहेत. सव्र्हे झाला त्या काळात शाहरुखचा एकही चित्रपट रिलीज न झाल्याने तो पिछाडीवर पडल्याचे म्हटले जात आहे. सव्र्हेच्या काळात सलमानच्या चित्रपटांनी 233.5क् कोटींची कमाई केली, अमिताभ यांच्या चित्रपटांनी 196.5क् कोटी, तर शाहरुखच्या चित्रपटांनी 2क्2.4क् कोटी कमाई केली होती.