Join us

सलमानला नकार दिला नाही : दीपिका

By admin | Updated: November 10, 2014 00:14 IST

बॉलीवूडच्या १०० कोटी क्लबची राणी दीपिका पदुकोणने सलमानसोबत काम करायला कधीही नकार दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे

बॉलीवूडच्या १०० कोटी क्लबची राणी दीपिका पदुकोणने सलमानसोबत काम करायला कधीही नकार दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दीपिकाच्या मते सलमानसोबत काम करण्याची संधी मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे. त्यामुळे तिने कधीही त्याच्यासोबत काम करायला नकार दिला नाही. यापूर्वी बातमी होती की, ‘किक’ या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी सर्वांत आधी दीपिकाला विचारणा झाली होती; पण तिने चित्रपट करायला नकार दिला. दीपिका म्हणाली की, ‘या सर्व अफवा आहेत, सलमानला नकार देणारी मी कोण. माझ्याकडे असे काही करण्याचा अधिकार नाही. सलमानसोबत काम करायचे नाही, असे मी कधीही म्हटले नाही.