Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानने लॉन्च केला ‘अ‍ॅक्शन गेम!’

By admin | Updated: August 31, 2016 02:00 IST

सलमान सध्या ‘बिग बॉस’च्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या प्रमोशनसाठी त्याने एक प्रोमो तयार केला आहे. ज्यात तो अंतराळवीर बनला आहे.

सलमान सध्या ‘बिग बॉस’च्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या प्रमोशनसाठी त्याने एक प्रोमो तयार केला आहे. ज्यात तो अंतराळवीर बनला आहे. नुकतेच त्याने जगातील पहिला आॅफिशियली अ‍ॅक्शन गेम लॉन्च केला असून, याबाबत त्याने ट्विटरवर माहिती दिली आहे. या गेममध्ये तीन पात्रे असून, त्यात सलमान खानचे अ‍ॅनिमेशन तयार करण्यात आले आहे. पहिले चुलबूल पांडेचे पात्र असून, जगातील धोकेबाजपणा कमी करण्याचे तो काम करणार आहे. दुसरे पात्र टायगरचे असून, जगातील आंतकवादाला नष्ट करण्याचा प्रयत्न तो करणार आहे, तर तिसरे पात्र पे्रमचे असून, जगातील वाईट गोष्टींची सफाई करणार आहे. यावर सलमानने ट्विटरवर व्हिडीओदेखील शेअर केला आहे.